MHADA Pune Lottery 2025 :पुणे महानगर प्रदेशात स्वतःच्या हक्काचा फ्लॅट घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडाने एका विशेष गृहनिर्माण योजनेची घोषणा केली असून, या लॉटरीद्वारे पुण्यातील महत्त्वाच्या आणि वेगाने विकसित होत असलेल्या ठिकाणी अतिशय परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध झाली आहेत.
हायवे लगत 'परफेक्ट' लोकेशन!पुण्यातील सर्वाधिक मागणी असलेल्या वाकड आणि हिंजवडी परिसरामध्ये ही घरे उपलब्ध आहेत. ही घरे 'यश्विन अर्बो सेंट्रो' या नामांकित खासगी गृहनिर्माण प्रकल्पात आहेत. हा प्रकल्प भूमकर चौक, इंदिरा गांधी कॉलेज आणि मुख्य हायवेला लागून असल्याने कनेक्टिव्हिटी उत्तम आहे. यामध्ये 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट्स उपलब्ध असून, त्यांचा कार्पेट एरिया साधारण ५०० ते ६०० स्क्वेअर फूट इतका आहे.
६० लाख रुपयांची थेट 'बचत' होणार!या योजनेतील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे घरांच्या किमती. 'म्हाडा'च्या या लॉटरीमुळे अर्जदारांना बाजारातील किमतीपेक्षा तब्बल ६० लाख रुपयांपेक्षा जास्त बचत होणार आहे.
| तपशील | बाजारातील अंदाजित किंमत | म्हाडा लॉटरीमधील किंमत | 
| किंमत श्रेणी | ८० लाख ते ९० लाख रुपये | २८.४२ लाख ते २८.७४ लाख रुपये | 
| बचत | ६० लाख रुपयांपेक्षा जास्त | 
एवढ्या उत्तम लोकेशनवर, इतक्या कमी किमतीत घर मिळण्याची ही सुवर्णसंधी मध्यमवर्गीय कुटुंबासाठी मोठी आर्थिक मदत ठरणार आहे.
अर्ज कसा आणि कधी करायचा?
- म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या: https://lottery.mhada.gov.in https://lottery.mhada.gov.in
 - वेबसाईटवर "Pune Board Lottery 2025" हा विभाग निवडून अर्ज प्रक्रिया सुरू करावी.
 - अर्ज भरण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०२५ रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे.
 - म्हाडाने सर्व इच्छुक अर्जदारांना आवाहन केले आहे की त्यांनी वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. या लॉटरीमध्ये पुण्यातील अनेक ठिकाणी घर घेण्याची संधी उपलब्ध आहे.
 
Web Summary : MHADA offers affordable homes in Pune's Wakad-Hinjewadi under a special housing scheme. 2 & 3 BHK flats are available in 'Yashwin Arbo Centro' with savings up to ₹60 lakhs compared to market prices. Apply by November 20, 2025, at lottery.mhada.gov.in.
Web Summary : म्हाडा पुणे के वाकड-हिंजवडी में एक विशेष आवास योजना के तहत किफायती घर प्रदान करता है। 'यशविन अर्बो सेंट्रो' में 2 और 3 बीएचके फ्लैट उपलब्ध हैं, जिनकी बाजार कीमतों की तुलना में ₹60 लाख तक की बचत है। 20 नवंबर, 2025 तक lottery.mhada.gov.in पर आवेदन करें।